Episodebeskrivelse
पुण्यात कोणाकडे गेल्यावर जर यजमानांनी विचारलं "चहा घेणार?", तर त्याचा खरा अर्थ काय असतो?'गप्पा गोष्टी मनातल्या' या पॉडकास्टच्या २४ व्या भागात तुमचं मनापासून स्वागत!आजचा आपला विषय प्रत्येक पुणेकराच्या आणि पुण्यात चुकून आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. विषय आहे आमचं 'पुणेरी आदरातिथ्य', म्हणजेच आमची पाहुणचार करण्याची एक अत्यंत विशिष्ट आणि जागतिक पातळीवर नावाजलेली पद्धत!बाहेरच्या जगात पाहुणे आले की लोक थेट चहा बनवून आणतात. पण पुण्यात आधी डोळ्यात डोळे घालून विचारलं जातं, "चहा घेणार?". या दोन शब्दांमागचा खरा पुणेरी अनुवाद, जेवणाच्या निमंत्रणामागची खरी गोम आणि सदाशिव पेठेत पत्ता…
Website: podcasters.spotify.com

