Episodebeskrivelse
"मित्रांनो, कल्पना करा कि तुम्ही रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीत शांतपणे झोपला आहात, आणि अचानक खिडकीतून एक काळाकभिन्न चोर आत घुसतो. तुम्ही डोळे उघडता आणि तुमच्या समोर तो चोर उभा असतो. अशा वेळी तुमची काय अवस्था होईल? तुम्ही ओरडाल, पळ काढाल किंवा भीतीने डोक्यावरून पांघरुण घेऊन झोपून जाल, बरोबर ना? पण जर तुमच्या जागी लोकमान्य टिळक असते, तर त्यांनी काय केले असते? ही गोष्ट आहे पुण्याच्या गायकवाड वाड्यातील, जिथे लोकमान्य टिळक राहत असत. एकदा रात्रीच्या वेळी एक अट्टल आणि धाडसी चोर टिळकांच्या घरात काहीतरी चोरी करण्याच्या उद्देशाने गुपचूप घुसला. तो हळूच कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात टिळकांना…

