Jakson kuvaus
गणपती अजून यायचे आहेत… पण त्यांची चाहूल लागली आहे.
घरातली लगबग, सजावटीची तयारी, आरतीचा आवाज, मोदकांचा वास आणि त्या सगळ्यातून जाग्या होणाऱ्या जुन्या आठवणी.
गणपतीच्या निमित्ताने यावेळी गप्पा आहेत श्रद्धेबद्दल नाही, तर त्या श्रद्धेकडे आपण कसं पाहायला शिकलो याबद्दल.
लहानपणी आरतीचे शब्द फक्त पाठ असतात. मोठं होताना त्यांचा अर्थ उमगतो. आणि कधी तरी जाणवतं…
आरती म्हणणं आणि प्रार्थना करणं यात एक बारीकसा फरक आहे.
गणपती येण्याआधीच्या या काही मनातल्या गप्पा.
गणपती बाप्पा मोरया!
तोपर्यंत, अजयचा राम राम!
Sivusto: podcasters.spotify.com

